सुभाष थोरात - लेख सूची

वारीचे अवडंबर

सध्या आषाढीची वारी सुरू आहे, पालख्या पंढरपुरात लवकरच दाखल होतील. पालखीचे किंबहुना वारकरी धर्माचे आजचे स्वरूप काय आणि मूळ वारकरी धर्म काय याचा ऊहापोह अगदी म.फुले यांच्या काळापासून होत आला आहे. आजही होत आहे. आज काही पुरोगामी संघटनांची मंडळी वारीमध्ये उत्साहाने सामील होऊन आम्हीही तुमचेच सगेसोयरे असे सांगत वारकर्‍यांना खरा वारकरी धर्म समजून देण्याचा प्रयत्न …

नवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत

कुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि …

अजब न्याय….

न्यायालयाने सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनविली आहे.(या शिक्षेला उच्च न्यायालयात त्वरित स्थगितीही मिळाली, त्यामुळे सलमानची तुरूंगवारी सध्यातरी टळली आहे). पण सलमानला शिक्षा सुनावताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींचे कंठ दु:खाने दाटून आले होते. परंतु सलमानच्या गाडीखाली जो माणूस झोपेतच चिरडून मारला गेला आणि आणखी काही लोक जखमी …

नाव नामदेवाचे… काम ठेकेदारांचे!

अ. भा. प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन घुमान येथे नामदेव नगरीत यथासांग पार पडले. घुमान (पंजाब) येथे एकही मराठी माणूस नसताना तेथे संमेलन घेण्याचा घाट का घातला गेला हे आम्हाला सुरवातीला कळलेच नव्हते. मराठी प्रकाशक खूपच नाराज झाले होते. कारण अशा संमेलनातच त्यांच्या पुस्तकांची विक्री मोठया प्रमाणावर होते. त्यांनी सुरूवातीला या संमेलनावर बहिष्कार घातला. पुढे असे …

`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे …

स्वच्छता अभियान: गांधी, मोदी आणि लेनिन

जातिव्यवस्थेने व्यवसाय स्वातंत्र्य नाकारून प्रत्येक व्यवसायासाठी एक स्वतंत्र जात निर्माण केली. जिने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जातीला ठरवून दिलेलेच काम केले पाहिजे असा दंडक घातला गेला. या व्यवस्थेनुसार सर्वात घाणेरडे काम, म्हणजे साफसफाईचे काम आणि तिन्ही वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करण्याचे काम शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींवर सोपवण्यात आले. अशा प्रकारे स्वच्छतेची जबाबदारी अतिशूद्रांवर ज्यांना आपण …